अहमदनगर

झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील ‘हा’ शेअर तब्बल 48 टक्क्यांनी घसरला

भारतातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओचा भाग असलेल्या Nazara Technologies चा शेअर 21 जानेवारी 2022 पासून 36 टक्के घसरला आहे. हा स्टॉक आतापर्यंत 48 टक्के खाली आला आहे. शुक्रवारी हा शेअर 1737 रुपयांवर ट्रेड करत होता.

30 मार्च 2021 रोजी, नझाराचा शेअर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज वर 1,990 रुपयांच्या किमतीत सूचीबद्ध झाला. त्याच दिवशी तो 1,552 रुपयांवर बंद झाला.

यानंतर, 15 सप्टेंबर 2021 पर्यंत, हा स्टॉक 1,980 ते 1450 रुपयांच्या दरम्यान ट्रेड करत राहिला. 14 सप्टेंबर रोजी, या स्टॉकने 1980 ची पातळी ओलांडली आणि 11 ऑक्टोबर 2021 रोजी शेअरने 3,356 रुपयांचा उच्चांक गाठला.

गुंतवणूक करावी कि नाही? जाणून घ्या तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक 1500-1600 रुपयांच्या श्रेणीत खरेदी करणे चांगले होईल.

यानंतर, एका वर्षाच्या आत, हा स्टॉक 2100 रुपयांपर्यंतचे टार्गेट देऊ शकतो. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही एक उत्तम संधी असेल.

नझारा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स 1500 ते 1600 रुपयांच्या रेंजमध्ये चांगली खरेदी संधी तयार करतील अशी अपेक्षा आहे. काही काळ प्रतीक्षा करावी, कारण स्टॉक काही काळ कन्सॉलिडेट राहू शकतो.

शेअरमध्ये 1500 ते 1600 रुपयांच्‍या रेंजमध्‍ये 2100 च्‍या एका वर्षाच्या टार्गेटसाठी खरेदी करण्‍याची शिफारस केली आहे. यासाठी स्टॉप लॉस 1400 च्या पातळीवर राखला गेला पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button