शिर्डी हायप्रोफाईल सेक्स रॅकेट : अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिष्ठित महिलेला पोलिसांनी केली अटक !

Shirdi High Profile Sex Racket :- ज्या शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीवर डोके टेकविण्यासाठी येतात, त्याच शिर्डी शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याचे आढळून आले आहे.
शिर्डी येथे हायप्रोफाईल देह व्यापार चालत असलेल्या ६ लॉजवर ‘पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी छापा टाकत मोठी कारवाई केली होती. यातील एका हॉटेल/लॉजचे मालक असलेल्या येथील एका प्रतिष्ठित महिलेस शिर्डी पोलिसांनी अटक केली.
तिला राहता न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दि. ५ मे रोजी शिर्डी शहरात एकाच वेळी ६ लॉजवर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली होती.
पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शिर्डी येथील तब्बल सहा बड्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाई सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. हॉटेलमधून १५ पिडित मुलींची सुटका करण्यात आली असून, ११ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री केली होती.
अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मोठ्या पोलिस ‘फौजफाट्यासह मोठी कारवाई झाली. यामध्ये १ अल्पवयीन विदेशी मुलीची सुटका करण्यात आली. सदर तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडे आला असता त्यांनी देहव्यापार चालणाऱ्या हॉटेल /लॉज मालकांवर ‘पिटा व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करत अधिक चौकशीअंती हॉटेलमालकांच्या विरोधात ११ मे रोजी गुन्हा दाखल केला.
तीन हॉटेलमालकांना अटक झाली होती, तर आणखी तीनपैकी एक हॉटेल /लॉज मालक महिला राहुरीतील असल्याने त्यांना रोजी पोलिसांनी चौकशीला बोलावले असता चौकशी केल्यानंतर त्यांनाही ताब्यात घेत कोर्टात हजर केले असता पोलिस कोठडी देण्यात आली.
दरम्यान कारवाईची माहिती मिळताच जेथे असे प्रकार सुरू होते, ती हॉटेल बंद झाली. त्यामुळे पोलिसांनाही मोहीम आटोपती घ्यावी लागली. शिर्डीत अन्य प्रकारची गुन्हेगारी वाढल्याच्या तक्रारी नेहमी केल्या जातात. त्यावर कारवाईही होते. मात्र, अशा प्रकारचे धंदेही शिर्डीत सुरू असल्याचे आता उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय ओळख असलेले तीर्थक्षेत्र शिर्डी येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल व लॉजिंग व्यवसाय चालतो.
करोनाच्या काळात व्यवसाय बंद पडल्याने या व्यावसायिकांसंबंधी सहानुभूती निर्माण झाली होती. विमानसेवा आणि रस्ते वाहतूक सुविधा उपलब्ध झाल्याने शिर्डीतील हॉटेल व्यवसाय अडचणीत आल्याचीही चर्चा असते.