शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्याचा मुक्काम कोठडीत

येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, अॅट्रॉसिटी कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात पसार असलेला आरोपी नगर पंचायत समितीचा माजी सदस्य तथा शिवसेनेचा नेते गोविंद अण्णा मोकाटे (रा. इमामपूर, ता. नगर) याला आज सकाळी अटक करून दुपारी न्यायालयात हजर केले होते.
त्याला न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गोविंद मोकाटे याच्याविरूद्ध डिसेंबर 2021 मध्ये तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात झाला होता.
नगर शहरातील एका उपनगरात राहणार्या महिलेने याबाबत फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी मोकाटे हा पसार होता. त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
मात्र, त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मंगळवारी त्याने तोफखाना पोलिसात आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.