Home अहमदनगर Ahmednagar News : धक्कादायक ! जोडप्याला रस्त्यात अडवले, बेदम मारले, पतीसमोरच महिलेवर...

Ahmednagar News : धक्कादायक ! जोडप्याला रस्त्यात अडवले, बेदम मारले, पतीसमोरच महिलेवर अत्याचार

0
76
Ahmednagar News
Ahmednagar News

Ahmednagar News : महिलांवरील अत्याचाराचे अनेक प्रकार नेहमीचसमोर येत आहेत. आता एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.

नगर वरून गावाकडे दुचाकीवरून जात असताना महिलेवर अत्याचार झाला. या जोडप्यास तीन अज्ञात लोकांनी रस्त्यात अडवून जोडीदाराला बेदम मारले.

त्यानंतर ३८ वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार गुरूवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान नांदुर विठ्ठलाचे रस्त्यावर घडला आहे.

महिला व तिच्या जोडीदारावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक समजलेली माहिती अशी : आष्टी तालुक्यातील एका गावात हे जोडपे वास्तव्यास आहे. हे जोडपे कामानिमित्त नगरला आले होते. रात्री उशिरा गावाकडे ते निघाले होते.

गावाकडे परतत असताना बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील नांदुर विठ्ठलाचे रस्त्यावर अज्ञात तिघाजणांनी दुचाकी अडवली. त्यानंतर जोडीदाराला बेदम मारहाण करत महिलेला देखील मारहाण केली.

त्यानंतर नराधमांनी महिलेवर जबरदस्ती अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही माहिती अंभोरा पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर या दोघांनाही उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदरील जोडपे गावाकडे जात असताना तीन लोकांनी मारहाण केली व महिलेवर अत्याचार झाल्याचे ती महिला सांगत असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पुढील तपास करतील. त्यानंतर आणखी माहिती समोर येईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here