अहमदनगर

धक्कादायक: अल्पवयीन मुलीचे अपहरण; अत्याचार करून दिलं सोडून

अहमदनगर – राहुरी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे (वय – १४) तिच्या राहत्या घरासमोरून अपहरण करून तिच्यावर पारनेर तालुक्यात अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी ही दि. 27 जून रोजी संध्याकाळी जेवण करून तिच्या आई सोबत घराच्या समोर असलेल्या पटांगणामध्ये झोपली होती. मध्यरात्री एक वाजे दरम्यान टिक्कल बर्डे हा त्या अल्पवयीन मुली जवळ गेला. त्याने तिला झोपेतून उठवून तिचे तोंड दाबून उचलून थोडे लांब नेले. तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून तू जर आरडाओरडा केला तर बघ, अशी दमदाटी केली.

त्यानंतर तिला गाडीवर बसवून पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर शिवारात नेले. तिथे एका पडक्या खोलीमध्ये तिच्या इच्छेविरूध्द तिच्यावर अत्याचार केला. जर आता घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकीन. अशी धमकी देऊन तो तेथून निघून गेला.

ती अल्पवयीन मुलगी कशीबशी आपल्या घरी पोहचली. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात हजर होऊन फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून टिक्कल रोहिदास बर्डे (रा. बारागाव नांदूर ता. राहुरी) याच्यावर अपहरण, अत्याचार तसेच बालकांचे लैंगिक शोषण अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button