अहमदनगर

धक्कादायक: लग्न करून अल्पवयीन मुलीला केस कापून भिक मागायला लावले

अहमदनगर- एका अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्या मामाच्या अल्पवयीन मुलासोबत लावून दिल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. दरम्यान लग्नानंतर मामा-मामीने पीडित अल्पवयीन मुलीचे केस कापून तिला मशिदीसमोर भिक मागण्याकरिता पाठविले असल्याची धक्कादायक घटना अहमदनगर शहरात घडली आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पीडितेचे मामा-मामी, आई-वडिल, लग्न लावणारा मौलाना व लग्न करून अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा यांच्याविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अंगणवाडी सुपरवायझर भागीरथी सदाशिव बहिरवाडे (वय 55 रा. दिल्लीगेट) यांनी फिर्याद दिली आहे.

 

दरम्यान गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्‍वास भान्सी, पोलीस अंमलदार सलीम शेख, शिवाजी मेहर यांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. 13 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीचे लग्न मामाच्या मुलासोबत करण्याचा हट्ट मुलीच्या मामीने धरला होता. 22 मे, 2022 रोजी सकाळी पीडितेची मामी त्यांच्या घरी आली व आई-वडिलाला म्हणाली,‘तुमची मुलगी व माझा मुलगा यांचा आज रोजी साखरपुडा करायचा आहे’, असे म्हटल्यानंतर पीडितेचे आई-वडिल तिला घेऊन मामाच्या घरील गेले.

 

तेथे मौलाना हजर होता. दरम्यान पीडितेचा साखरपुडा न करता लग्न करण्याचे ठरले. त्याला आईने विरोध केला असता मामा-मामीने त्यांना लग्न करण्यास तयार केले. पीडितेचे लग्न बळजबरीने तिच्या मामाच्या अल्पवयीन मुलासोबत लावून दिले.

 

दरम्यान लग्न झाल्यानंतर पीडितेसोबत अल्पवयीन मुलाने शरीरसंबंध ठेऊन अत्याचार केला. लग्नानंतर 10 ते 12 दिवसांनीच पीडितेचे सासू-सासरे (मामा-मामी) यांनी तिचे केस कापून तिला एका मस्जिदसमोर भिक मागण्यासाठी पाठविले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक भान्सी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button