अहमदनगर

धक्कादायक: अल्पवयीन मुलीला गोळ्या खाऊ घालून गर्भपात करण्याचा प्रयत्न

अहमदनगर- विवाहित अल्पवयीन मुलीला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या पीडित अल्पवयीन मुलीवर पुणे येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने उपचारादरम्यान राजगड (पुणे) पोलिसांना जबाब दिला. तो जबाब राजगड पोलिसांनी येथील एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला.

 

एमआयडीसी पोलिसांनी पीडित मुलीचा पती, सासू, सासरेविरूध्द अत्याचार, छळ, मारहाण, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 20 नोव्हेंबर, 2021 ते 26 जून, 2022 दरम्यान वेळोवेळी घडली आहे.

 

नगर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या तरूणाचे फिर्यादीसोबत लग्न झाले होते. लग्नासाठी झालेल्या खर्चाची मागणी करत पती, सासू-सासर्‍याने फिर्यादीचा छळ केला. मारहाण, दमदाटी केली. फिर्यादी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्या पतीने शारिरीक संबंध ठेवून गर्भवती केले.

 

तसेच गर्भधारणा झाल्यानंतर हे मुल माझे नाही म्हणून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून गर्भपाताच्या गोळ्या बळजबरीने खायला देवून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीचा सासू-सासर्‍याने वेळोवेळी मानसिक, शारिरीक छळ केल्या असल्याचे पीडितीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

 

एमआयडीसी पोलिसांनी फिर्यादीच्या पतीसह सासू-सासर्‍याविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button