अहमदनगर

धक्कादायक: नगरसेवकाच्या भावाची निर्घृण हत्या

अहमदनगर – पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक भूषण शेलार यांचा चुलत भाऊ सिध्देश संजय शेलार (20) यांची शिरूर तालुक्यातील शिक्रापुरमध्ये धारधार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.

याप्रकरणी पुणे पोलीसांनी एका हल्लेखोरास अटक केली असून इतर दोघे पसार झाले आहेत. विकी खराडे (रा. शिक्रापुर ता. शिरूर जि. पुणे) व त्याच्या इतर दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात नगरसेवक भूषण शेलार यांनी शिक्रापुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्यात नमुद करण्यात आले आहे की, त्यांचा चुलत भाऊ सिध्देश हा शिक्रापूर येथील अजित कारंजे याच्यासोबत पानाच्या टपरीचा व्यवसाय करीत होता. सोमवारी (दि.18) तो पारनेर येथे आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी भूषण व त्याची भेट झाली त्यावेळी विकी खराडे हा मला जीवे मारण्याची धमकी देत असून त्याची मला भीती वाटत असल्याचे सिध्देश याने सांगितले होते. त्यावर विकी खराडेपासून तु दुर रहा असा सल्ला भूषण यांनी त्यास दिला होता. त्यानंतर सिध्देश शिक्रापुर येथे गेला होता. यानंतर मध्यरात्री घटना घडली.

बांदल कॉम्लेक्स, पाट वस्ती शिक्रापूर येथे सिध्देश याच्यावर धारधार शस्त्राने तिघा हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे स्थानिकांनी सांगितले. सिध्देश याच्या हातावर, डोक्यावर, मानेवर वार करण्यात आले आहेत. यानंतर स्थानिकांनी त्यास खासगी रूग्णालयात हालविले मात्र तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

फिक्स मर्डर टाकणार तुझी
सिध्देश याच्या मोबाईल सोमवारी रात्री 11 वाजून 42 मिनिटांनी एका मोबाईल नंबरवरून मिस कॉल आलेला होता. सिध्देश याने काढून ठेवलेल्या स्क्रिन शॉटमध्ये विकी खराडे 302 या इंस्टाग्राम अकाउंटवरून 2 जुन 2022 रोजी पहाटे 3 वाजून 41 मिनिटांनी एक संदेश आलेला होता. तु शाळा केली माझ्यावर, तुला सोडणार नाही. फिक्स मर्डर टाकणार तुझी, मी नाही भीत कोणालाच, एकतर मी मरेल नायतर सगळयांना मारेन, मीत्र म्हणाला होता. स्वतःहून तुला पण द्यायला आलो होतो, तु माझ्यावरच घात केला, कोणत्या भाईला बोलवायचे बोलव, तुझा ट्रॅप मीच लावणार असा संदेश विकी खराडे याने सिध्देश यास पाठविलेला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button