अहमदनगर

धक्कादायक: क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला काटेरी वनात नेऊन…

अहमदनगर- एका खासगी क्लासला जाणार्‍या अल्पवयीन मुलीचा वेळोवेळी पाठलाग करुन, तिला दुचाकीवर बसवुन श्रीरामपूर शहरातील रेल्वेब्रीज परीसरातील काटेरी वनात नेवुन तिचा विनयभंग केला. तसेच त्यावेळी तिचे सोबत फोटो काढले, तिला मारहाण केली तसेच फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीस काल पोलिसांनी अटक केली.

 

पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील कांदा मार्केटच्या मागे राहत असलेल्या प्रमोद अरुण शिंदे याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला तसेच त्यावेळी तिचे सोबत फोटो काढले, तिला मारहाण केली.त्यानंतर वेळोवेळी फोटो व्हायरल करण्याची तसेच आत्महत्या करण्याची धमकी देवुन वेळोवेळी यातील अल्पवयीन मुलाचा विनयभंग केला.

 

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासुन पसार होता. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सदर आरोपीचा शोध घेणे कामी तपास पथकास आदेश दिले. त्यानुसार तपासाची चक्रे फिरवत तपास पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेतला असता, आरोपी श्रीरामपुर शहरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचुन प्रमोद अरुण शिंदे यास शिताफिने अटक केली आहे. पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचेकडील तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल रमिझराजा अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे, पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण सांगळे तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पोलीस नाईक फुरकान शेख व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव यांनी केली असुन, दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button