धक्कादायक: मतीमंद युवतीवर अत्याचार; नराधम चुलता गजाआड

अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या मुकबधीर व मतीमंद युवतीवर अत्याचार करणारा नराधम तीचा चुलताच निघाला. पाथर्डी पोलिसांनी पाच महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर अखेर अत्याचारी शोधुन काढला. त्याला अटक करण्यात आली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील मतीमंद व मुकबधीर युवतीचे पोट दुखु लागल्याने तिला कुटुंबियांनी दवाखान्यात नेले. तेथे ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
2 मार्च 2022 रोजी युवतीच्या आईने पोलिसात फिर्याद दाखल केली होती. मुलगी मतीमंद असल्याने तीला काहीच बोलता अथवा सांगता येत नव्हते. यामुळे या घटनेचा तपास करणे पोलिसासमोर कडवे आव्हान होते. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, सागर मोहीते यांनी या प्रकरणाचा तपास केला. पिडीत मुलीला बोलता येत नव्हते. ऐकु येत नव्हते व ती मतीमंदही होती.पोलिसांनी मुकबधीर विद्यार्थ्यांचे शिक्षक घेवुन तपास केला.
सुमारे वीस लोकांचे रक्ताचे नमुणे घेवुन नाशिक येथील न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तापसणीसाठी पाठविले. संशयित पीडित युवतीच्या चुलत्याचे नमुने घेतल्यापासुन त्याचे वागने संशयास्पद असल्याचे पोलिसांना जाणवले होते. त्याच्यावर लक्ष ठेवले गेले. अखेर रविवारी नाशिकच्या प्रयोगशाळेचा अहवाल पोलिसांना मिळाला. त्यामधे पीडित मुलीला गर्भवती करणारा तिचा चुलता संशयित असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. सोमवारी त्याला न्यायाधीश व्ही.आय.शेख यांच्यासमोर हजर केले. त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शेख यांनी दिले आहेत.