अहमदनगर

धक्कादायक: महिलेचे मॉर्फ केलेले फोटो पाठविले सोशल मीडियावर

अहमदनगर- सोशल मीडियावर कोण कधी काय व्हायरल करील याचा नियम नाही. अलिकडच्या काळात सायबर चोरट्यांकडून फसवणूक केलेल्या अनेक घटना घडत आहे. यामध्ये लोन अ‍ॅपवरून फसवणूक केल्याचे अनेक प्रकरण समोर येत आहेत. नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या महिलेने लोन अ‍ॅपवर अपलोड केलेले फोटो सायबर चोरट्यांनी मॉर्फ करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

संबंधीत महिलेची बदनामी केल्याचा प्रकार समोर आल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मोबाईल नंबरधारक व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फिर्यादी यांना सोशल मीडियावर एका लोन अ‍ॅपची लिंक आली होती. त्यांनी लोन अ‍ॅपव्दारे झटपट कर्ज घेण्याच्या नादात आधारकार्ड, पॅनकार्ड व स्वतःचा फोटो अपलोड केला. त्यानंतर एका अज्ञात मोबाईल नंबरवरून फिर्यादीकडे पैशाची मागणी केली.

 

तसेच, पैसे न दिल्यास मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी पैसे न दिल्याने सदर मोबाईल नंबरधारक व्यक्तीने फिर्यादी यांच्या नातेवाई, मैत्रिणींना मॉर्फ बदनामीकारक फोटो पाठविले. ही बाब लक्षात आल्यनंतर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button