अहमदनगर

धक्कादायक: शेतीच्या बांधावरून युवकाचा खून

अहमदनगर- झालेल्या मारहाणीत युवकाचा खून करण्यात आल्याची घटना शेवगाव तालुक्यातील मडके येथे घडली. योगेश दिपील वडघणे (22) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

 

मारहाणीत योगेश जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी त्यास मारहाण करणार्‍या बाप-लेकांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

सिताराम रणजीत वडघणे (55) व नामदेव सिताराम वडघणे (35, रा. दोघेही मडके, ता. शेवगाव) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मडके येथे शेतीच्या बांधावरील बोरीच्या काट्या का काढल्या या कारणाने 8 जुलै रोजी वडघणे कुटुंबात वाद होऊन त्यात योगेश दिलीप वडघणे व त्याची आई रुक्मिणी दिलीप वडघणे यांना संशयित बापलेकांनी लाकडी काठ्यांनी मारहाण केली होती. यात दोघेही जबर जखमी झाले होते. गंभीर दुखापतीमुळे अहमदनगर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

 

 

परंतु दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबाद येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये 12 जुलै रोजी दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना काही तासांत योगेश वडघणे याचा उपचारादरम्यान बुधवारी (दि.13) मृत्यू झाला. यामुळे शेवगाव पोलिसांनी संशयितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना रात्री अटक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button