अहमदनगर

धक्कादायक ! जिल्ह्यात आरटीओ अधिकार्‍यास दोघांकडून मारहाण

शिरसगाव येथील दोघांनी श्रीरामपूर येथील परिवहन अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ आरटीओ अधिकार्‍यास शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शिरसगाव येथील गणेश आमले व विजय जाधव हे दोन तरुण मोटारसायकलवरुन आले आणि बरेच दिवस झाले सगळी कागदपत्रांची पूर्तता केलेली असून आम्हाला आमची रजिस्टर नोंदणी करावी, अशी मागणी केली.

त्यावर आरटीओ अधिकार्‍यांनी ऑनलाईन नोंदणी करा तुम्हाला तात्काळ तुमचे रजिस्ट्रेशन नोंदणी करतो असे सांगितले. मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्येल्या त्या दोघांनी थेट अधिकार्‍यास शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर परिसरातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या दोघांना ताब्यात घेतले.

याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत दोघांनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येवून गणेश आमले व विजय जाधव या दोघांविरुध्द शिवीगाळ करुन मारहाण करणे व सरकारी कामात अडथळा आणणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button