अहमदनगर

धक्कादायक ! बहिणीने केला भावाचा खून; ‘या’ ठिकाणी घडली घटना

भाऊ नेहमी मारहाण करत शिवीगाळ करत असल्याच्या जाचाला कंटाळून श्रीरामपूर येथील बहिणीने मनमाड येथे तिच्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेनंतर बहिणीने मनमाड पोलीस स्टेशन गाठत खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे संदीप गोगे हा त्याची आई व इतर नातेवाईकांसमवेत राहत होता. आई आजारी असल्यामुळे श्रीरामपूर येथे राहणारी त्याची बहिण शोभा गारुडकर ही आईची सेवा करण्यासाठी मनमाड येथे काही महिन्यांपूर्वी गेली होती.

संदीप हा व्यसनी असल्याने तो शोभाला नेहमीच त्रास देत होता. नेहमीच शिवीगाळ करणे, मारहाण करणे अशी कृत्ये करू लागला. संदीपच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर शोभाने टोकाचे पाऊल उचलत संदीपच्या पोटावर सपासप वार केले.

त्याचा तेथेच मृत्यू झाला. शोभाने घटनेनंतर थेट मनमाड पोलीस स्टेशन गाठले व आपल्या भावाचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात शोभा गारुडकर हिच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button