अहमदनगर

धक्कादायक: शिक्षकांकडून विद्यार्थ्याचे केस पकडून मारहाण; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अहमदनगर- एका विद्यार्थीने शिक्षकांना शेरोशायरी केल्याने झालेल्या गैरसमजातून काही शिक्षकांनी विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली. मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना शुक्रवारी 20 जानेवारी घडल्याची माहिती आहे. ज्ञानमंदिर जुनियर कॉलेज आळे (ता. संगमनेर) येथे हा प्रकार घडला.

 

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी काही मुलांच्या घोळक्यातील एका मुलाने शिक्षकांना पाहून शेरोशायरी केली. याबाबत कोणतीशी शहानिशा न करता शाळेतील शिक्षकाने शिपायाच्या मदतीने एका विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

 

माझी चूक नाही अशी विद्यार्थ्याने वारंवार विनवणी करुनही शिक्षक आणि शिपाई त्याला मारहाण करीत होते. याच वेळी एका विद्यार्थ्याने त्याच्या मोबाईलवर घटनेचे चित्रिकरण केले. ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर शिक्षकाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यालय प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी तात्काळ मंगळवारी बैठक बोलावली आहे.

 

दोषीवर कारवाई केली जाईल, असे विद्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थीसह पालकांकडून विद्यालया विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

दरम्यान शुक्रवारी मुलाला मारहाण केल्यानंतर त्यांनी सदरील प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी शनिवारी सकाळी विद्यालयावर धडक मोर्चा काढत जाब विचारला. बर्‍याच वेळ गोंधळ चालल्याने सरपंच प्रीतम काळे यांनी पालकांची समजूत काढत गावाची आणि विद्यालयाची बदनामी होईल म्हणून सर्वांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. पालकांनी लवकरात लवकर कारवाई करत शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button