अहमदनगर

धक्कादायक ! चेहरा छिन्नविच्छिन्न झालेला तरूणाचा मृतदेह आढळला

अहमदनगर- दत्तनगर (ता. श्रीरामपूर) एमआयडीसी येथील वाकडी रस्त्याच्या जवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 

सदर मृतदेहाच्या अंगात लाल रंगाचे स्वेटर, पांढर्‍या रंगाचा शर्ट, आकाशी रंगाची जीन्स, पायात स्पोर्टस् बूट, परिधान केलेले आहे. सदर मृतदेहच्या तोंडावर कोणत्या तरी टणक वस्तूने जोरात मारल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. त्यामुळे चेहरा छिन्नविच्छिन्न झालेला आहे.

 

माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी पथकासह दाखल झाले होते. श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. तसेच बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण करून त्यांचा खून करून त्यांचा मृतदेह याच परिसरात टाकण्यात आला होता. आता पुन्हा याच भागात मृतदेह सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button