अहमदनगर

धक्कादायक: अत्याचार करून मुलीला विकलं कुंटणखान्यात

अहमदनगर- कुविख्यात गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीस विकत घेणार्‍या महिलेस पोलिसांनी गजाआड केले. श्रीरामपुरातील कुविख्यात गुन्हेगार मुल्ला कटर व बाबा चंडवाल यांच्याकडून शेवगाव येथील महिलेने विकत घेतले होते. श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने त्या महिलेला अटक केली आहे.

 

या महिलेविरुध्द श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेस काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. अल्पवयीन मुलींना फसवून अमिष दाखवून निकाह करून अत्याचार करणार्‍या कुविख्यात गुन्हेगार मुल्ला कटर हा अटकेत असून त्याने अजून किती मुलींना फसवून त्यांचेवर अत्याचार केले याचा तपास पोलीस उपअधीक्षक मिटके करत असून त्यांना या तपासात मुल्ला कटर याने अत्याचार करून त्या मुलीला बाबा चंडवाल याच्यामार्फत शेवगाव येथे कुंटणखाना चालविणार्‍या मिनाबाई मुसवत हिला विकल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मिटके व त्यांच्या पथकाने शेवगाव येथील नेवासा रोडवरील श्रीराम मंदिर भुखंडाच्या परिसरात तिच्या राहत्या घरी छापा टाकला.

 

पोलिसांना पहाताच मिनाबाईने पळ काढला होता. पोलिसांनी अतिरीक्त कुमक मागवून तिचा शोध घेतला असता ती उसाच्या शेतात लपली होती. त्या ठिकाणाहून तिला शोधून पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शेवगाव येथील कुटनखानाचालक मिनाबाई मुसवत हिच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी काल तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुल्ला कटर याने अल्पवयीन मुलींना फसवून त्यांचेवर अत्याचार करुन धर्मांतर करुन निकाह केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येवून त्याच्यासह आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button