अहमदनगर

धक्कादायक: वेठबिगारीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

अहमदनगर- वेठबिगारीसाठी अनेक अल्पवयीन मुलांचा वापर झाल्याने प्रकरण मध्यंतरी चर्चेत आले होते. त्याची सुनावणी केंद्रीय अनु.जमाती आयोगासमोर सुरू आहे.

 

दरम्यान कातकरी व भिल्ल समाजाच्या अल्पवयीन मुलांच्या अज्ञानपणाचा व गरिबीचा फायदा घेऊन वेठबिगार म्हणून त्यांच्याकडून शेळ्या मेंढ्या सांभाळण्याचे जबरदस्तीने काम करून घेऊन त्यांची शारीरिक व मानसिक छळवणूक केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे घडली असून याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

डिग्रस येथील अहिलाजी भिकाजी पुणेकर व किशोर लक्ष्मण वावरे यांनी शेळ्या मेंढ्या सांभाळण्यासाठी अल्पवयीन मुलांना आपल्या गावी आणले होते. त्यांनी त्यांच्याकडे कामास असलेले कातकरी व भिल्ल समाजाची मुले यांच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांचेकडून वेठबिगार म्हणून शेळ्या मेंढ्या सांभाळण्याचे जबरदस्तीने काम करून घेतले. चार महिन्यापूर्वी हा प्रकार घडला होता.

 

याबाबत गोकुळ देवराम हेलम यांनी तालुका पोलीस ठाण्यात काल फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अहिलाजी भिकाजी पुणेकर व किशोर लक्ष्मण वावरे दोघे राहणार डिग्रस तालुका संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 50/2023 भा.दं.वि कलम 374, बंधबिगार अधिनियम 1976 चे कलम 16,17,18 सह अनुसूचित जाती अधिनियम 1989 चे सुधारित 2015 चे कलम 3(1 ) एच व बालकामगार ( प्रतिबंध आणि विनियमन ) अधिनियम 1986 चे कलम 3,14 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सातव हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button