अहमदनगर

धक्कादायक: तरूणीला काटवनात नेले अन् पाच जणांनी आळीपाळीने…

अहमदनगर- तरूणीला बळजबरीने रिक्षातून भिंगार शहरातील गोंविदपुराच्या पुढे काटवनात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या पीडित तरूणीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

इम्रान शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. मुकुंदनगर), शहानु शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. बाराइमाम, कोठला), रिक्षा चालक अकरम ऊर्फ अरशद (रा. झेंडीगेट), बाशीद मुक्तार खान (रा. लिंक रोड, केडगाव) व केडगाव उपनगरात राहणारी एक महिला यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. वरील पाच आरोपींनी पीडित फिर्यादी तरूणीला बळजबरीने रिक्षातून गोंविदपुराच्या पुढे काटवनात नेले. पीडितेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी महिलेने पीडितेचे हात धरले व इतर आरोपींनी आळीपाळींनी अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भिंगार कॅम्प पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button