अहमदनगर

धक्कादायक: तिघांनी अल्पवयीन मुलीला पळवून नेले अन्…

अहमदनगर – नगर तालुक्यातील एका गावातून तिघांनी एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. प्रियंका अशोक खडके (वय 24), सोमनाथ दत्तु धुळे (वय 19) व श्रावण संजय गायकवाड (वय 18, सर्व रा. चिंचोडी पाटील ता. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या तिघांना ताब्यात घेत अटक केली. पीडित मुलीची सुटका केली. तिच्या जबाबावरून तिघांविरूध्द दाखल असलेल्या गुन्ह्यात वाढीव भादंवि कलम 376 (1), (2), (1) 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button