अहमदनगर

धक्कादायक: जिलेटीन कांड्याने दुचाकी उडविण्याचा प्रयत्न; ‘या’ धरण परिसरात खळबळ

अहमदनगर – झाडाखाली लावलेल्या दुचाकीला दोन जिलेटिन आरडीएक्सच्या कांड्या लावून उडवून देण्याचा प्रयत्न झाल्याने मुळा धरण परिसरात व गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे मुळा धरणसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

याविषयी माहिती देताना शेतकरी बाळासाहेब सहादू मंडलिक यांनी सांगितले की, मी नित्यनेमाप्रमाणे दररोज सकाळी मळ्यात जात असतो. गुरुवारी (दि 25) रोजी सकाळी आठ ते चार या वेळात शेतात काम करत असताना व दुपारी चार वाजता जनावरांचा चारा घेऊन घरी निघालो असता मुळा नदी पात्रात धरणातून पाणी सोडलेले असल्याने सारेचे ओझे गाडीवर टाकून गाडी चालू करून मुळा धरणा मार्गे घरी निघालो.

 

गाडीवर बसून मी पाचशे फुटावर जात असताना गाडी अचानक बंद झाली मी गाडी चालू करण्यासाठी गाडीखाली उतरलो. त्यावेळी मला पेट्रोलच्या टाकी खाली व मशीन वरती दोन जिलेटिनच्या कांड्या व वायर बॉक्सर गाडीच्या दोन प्लगला जोडलेल्या दिसून आल्या. यासंबंधीची माहिती मी माझ्या मित्रांना व घरच्यांना दिली माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग घेऊन फोटो काढले. ते पूर्ण साहित्य काढून मी घरी घेऊन गेलो हे दोन्ही जिलेटिन दोन्ही प्लगला जोडलेले होते त्यापैकी एक प्लग खोलेला होता आणि तो अर्धवट स्थितीत लावून दिलेला होता.

 

त्यानंतर मी घरी आलो दुसऱ्या दिवशी सकाळी गावात तंटामुक्ती कडे दाद मागितली व पोलीस राहुरी पोलीस स्टेशनला माहिती दिली हेडकॉन्स्टेबल आव्हाड हे नांदूरला येऊन पूर्ण माहिती समजून घेतली. ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता माझ्या शेतापासून मुळा धरण व भिंत फक्त हाकेच्या अंतरावर आहे मुळा नदी पात्रात पाणी सोडलेले असल्याने शेतकरी वर्ग हा मुळा धरणावरून येजा करतात. तर मुळा धरण पाहण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील येतात.

 

दरम्यान हा प्रकार घडल्याने मुळा धरणाच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा प्रकारच्या जिलेटिनमुळे या अगोदरही मुळा धरणात मासेमारी होत असल्याचे प्रकार घडलेले आहे. याची तक्रार देखील प्रशासनाकडे आहे. संबंधित शेतकऱ्याकडे असलेल्या कांड्या पोलीस खात्याकडे देण्यात आलेल्या असून याविषयीची तक्रार मंडलिक यांच्याकडून राहुरी पोलीस स्टेशन कडे करण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button