धक्कादायक! अमिष दाखवून तरूणांकडून दोन महिलांवर अत्याचार

अहमदनगर- लग्नाचे अमिष दाखवुन दोन विवाहित महिलांवर दोन तरूणांनी अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. पीडित महिलांनी फिर्यादी दिल्या आहेत.
एका विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एका कोविड सेंटरमध्ये काम करीत असताना अक्षय बबन ससाणे (वय 26 रा. रेल्वेस्टेशन) याच्या बरोबर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने लग्नाचे आमिष दाखवुन वेळोवेळी माझ्यावर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ससाणे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एका खासगी रूग्णालयात काम करणार्या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पतीने सोडल्यानंतर राजू मुस्तफा शेख (रा. वाघगल्ली, नगर) याच्याबरोबर प्रेम संबंंध जुळुन आले. शेख याने लग्नाचे आमिष दाखवुन अत्याचार केला. लग्नाचा विषय काढला की शिवीगाळ, मारहाण करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. राजू शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.