अहमदनगर

धक्कादायक: प्रसूती झालेल्या दोन महिला बालकांना रूग्णालयात सोडून पळाल्या

अहमदनगर- येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसूती झालेल्या दोन महिलांनी आपल्या बालकांना तेथेच सोडून पलायन केल्याचे समोर आले आहे. यातील एका बालकाचा मृत्यूही झाला आहे.

 

सोनई येथील महिला प्रसूतीसाठी 28 जुलै, 2022 रोजी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल झाली होती. 1 ऑगस्ट रोजी तिची प्रसूती झाली. दरम्यान प्रसूती होताच तिने बालकाला सोडून पळ काढला आहे. ही बाब जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस अंमलदार संतोष विधाते यांनी बुधवारी (दि. 3) सकाळी सोनई पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. दरम्यान सदर बालकाचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

पुणतांबा येथील 35 वर्षीय महिलेला 24 जुलै, 2022 रोजी प्रसूतीसाठी रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रूग्णालयात घेवून येत असताना रस्त्यातच तिची प्रसूती झाली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. तीने 27 जुलै, 2022 रोजी बालकाला सोडून पलायन केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी यराहाता पोलिसांना बुधवारी सकाळी याबाबत माहिती दिली आहे. पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button