अहमदनगर

धक्कादायक: फेसबुकवर महिलेचा अश्लिल व्हिडिओ केला अपलोड

अहमदनगर- महिलेने फेसबुक पेजवर टाकलेल्या व्हिडिओ मार्फिंग करून त्या ठिकाणी अश्लिल व्हिडिओ अपलोड करत महिलेच्या व्हॉटस्अॅप नंबरवर पाठवून बदनामी केल्याचा प्रकार गुरुवारी (ता.२८) पहाटे घडला. शिर्डी (ता, राहाता) येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फिर्यादी महिलेचे फेसबुकवर पेज आहे. या पेजवर सदर महिलेने लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले होते. एका अनोळखी व्यक्तीने त्या व्हिडिओमध्ये मार्फिंग करत अश्लिल व्हिडिओ अपलोड केला. फिर्यादी महिलेच्या फोटोखाली अश्लिल मजकूर लिहिला. त्याची व्हिडिओ क्लिप महिलेच्या व्हॉटस्अपवर पाठवली. त्यामुळे महिलेला प्रचंड मानसिक त्रास झाला.

 

या महिलेने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यांनी पोलिसात फिर्याद देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अहमदनगरच्या सायबर पोलिस ठाण्यात येऊन याबाबतची फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी त्या मोबाईलधारकाविरुद्ध विनयभंग आणि माहिती – तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button