Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरजनतेचा पैसा चोरांच्या खिशात घालायचा का? : आ. कानडे

जनतेचा पैसा चोरांच्या खिशात घालायचा का? : आ. कानडे

Ahmednagar News : श्रीरामपूर योजना केवळ ठेकेदारांसाठी आहेत काय, अशा ठेकेदारांवर फौजदारी कारवाई केली पाहिजे होती, हा पैसा जनतेचा आहे,

तो चोरांच्या खिशात घालायला दिला काय, असा सवाल करून ज्या ज्या ठिकाणी पोट ठेकेदार नेमले याची माहिती द्यावी, गावातील सर्व घरांना पाणी मिळाल्यानंतर योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात यावे, असे आदेश आमदार लहू कानडे यांनी दिले आहेत.

आमदार लहू कानडे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात श्रीरामपूर तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांची आढावा बैठक घेतली.

या बैठकीत योजनेच्या कामात अनेक त्रुटी दिसून आल्याने आमदार कानडे यांनी संबंधित अधिकारी, ग्रामसेवक व ठेकेदारांना घारेवर धरले.

यावेळी सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण नाईक, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, जीवन प्राधिकरण विभागाचे उप अभियंता सुरेश गायकवाड, रवींद्र पिसे यांचेसह अनेक गावातील सरपंच उपस्थित होते.

यावेळी आमदार कानडे म्हणाले, या योजनेची अंमलबजावणी जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. कारेगावच्या योजनेचे काम पूर्ण न होताच योजना हस्तांतरित करून ठेकेदारांना पैसे अदा केले गेले.

कोणाच्या दबावाखाली हे काम केले. ही घाई कशासाठी केली, असा प्रश्न करून या गावाची ग्रामसभा बोलवावी, तसे मला अवगत करावे, आपण प्रत्यक्ष पाहणी करू, यावेळी अनुपस्थित ग्रामसेवकास नोटीस पाठवा. भोकर येथे ४ पाणी टाक्या बांधूनही १० वर्षे गावाला पाणी मिळाले नाही. त्या योजनेत या टाक्या बाद करून नवीन टाक्या केल्या.

जुन्या टाक्यांचा खर्च कोणाकडून वसूल करायचा, असा उल्लेख निविदेत असल्याने वाढीव अंदाजपत्रकासह योजना पूर्ण झाल्यानंतरच ती हस्तांतरित करावी, नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी, अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी.

योजनेच्या वितरकांमुळे रस्ते खोदले जाणार असल्याने चांगल्या रस्त्यांची वाट लागणार असल्याचे आपण अधिवेशन काळात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी अशा कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन आमदार कानडे यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments