अहमदनगर

काढलेले फोटो मित्रांना दाखवतो, असे म्हणत तरूणाकडून अल्पवयीन मुलीचा…

अहमदनगर- अल्पवयीन मुलीला मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांत सात जणांविरूध्द विनयभंग, मारहाण, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे.

 

मोसीन शेख, वसीम शेख, समीर शेख, दिलशाह अत्तार, अम्रीन अत्तार, गुलनास अत्तार, काजल अत्तार (सर्वांची पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. घासगल्ली, कोठला) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बुधवारी सायंकाळी मोसीन शेख हा फिर्यादीला भेटला व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून फिर्यादीचा विनयभंग केला. तसेच फिर्यादीसोबत काढलेले फोटो मित्रांना दाखवतो व तुझी बदनामी करतो, असे म्हणाला. घडलेला प्रकार फिर्यादीने आई-वडिलाला सांगितले. त्यांनी मोसीनला जाब विचारला असता त्याने व त्याचा भाऊ वसीमने फिर्यादीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत धमकी दिली.

 

दुसर्‍या दिवशी गुरूवारी दुपारी फिर्यादी घरात एकटीच असताना मोसीन हा अन्य सहा जणांसह फिर्यादीच्या घरात घुसून लग्न करण्याची मागणी केली व शिवीगाळ, मारहाण करत विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button