Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : साहेब ! शेतकऱ्याच्या घरावरही ईडीची धाड टाका, परिस्थिती समजेल..विकसित...

Ahmednagar News : साहेब ! शेतकऱ्याच्या घरावरही ईडीची धाड टाका, परिस्थिती समजेल..विकसित भारत संकल्प रथ गावात येताच शेतकरी आक्रमक..

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या विविध योजनांविषयी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारचा विकसित भारत संकल्प रथ गावोगावी जाऊन माहिती देत आहे.

परंतु अहमदनगर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये या रथ यात्रेला कडाडून विरोध झाला. अनेक गावांतून हा रथ काहींनी परतवूनही लावला.

आता मढी या ठिकाणीही असाच काहीसा अनुभव आला. येथे हा रथ येताच शेतकऱ्यांनी विकास, महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारचे काहीच धोरण नाही. ईडीची धाड शेतकऱ्यांच्या घरावर टाका.

शेतकरी किती कर्जबाजारी आहे, ते कळेल. कांदा, दूध, कापसाला भाव नाही अशा विविध समस्या मांडत आपली उद्विग्नता व्यक्त करत शेतकऱ्यांच्या मुलांनी विकसित भारत संकल्प यात्रा रथाला कडाडून विरोध केला.

नेमके काय घडले

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी सुरु असणारी विकसित भारत संकल्प यात्रा मढी येथे आली होती.

तेथील ग्रामसेवकांनी निमंत्रित केलेल्या ग्रामस्थांच्या हातात योजनांचे फलक होते. परंतु हे सर्व सुरु असतानाच या गावातील शेतकरी बाळासाहेब मरकड यांनी जोरदार आक्षेप घेत अत्यंत पोटतिडकेने भावनिक होत आपल्या समस्या मांडल्या.

‘आमचे संपूर्ण गाव कांदाउत्पादक आहे, पण रात्रीतून सरकारने निर्यातबंदी लावली. ४० रुपये किलो दराचा कांदा १० रुपयांवर आला,

मग नेमका या यात्रेचा उद्देश काय? ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती ढासळली असून, शेतकरी व सर्वसामान्य मेटाकुटीला आला आहे.

विकास, महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीच धोरण नाही..’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी अधिकाऱ्यांचीही भंबेरी उडायला मिळाली.

 साहेब ! शेतकऱ्याच्या घरावरही ईडीची धाड टाका..

यावेळी शेतकरी मरकड यांनी व्यथित होत भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, दुधाच्या हमी भावाचे काय झाले? गुजरातमध्ये गायीच्या दुधाला ४० रुपये लिटर दर असताना, महाराष्ट्रात २० रुपये का? कांदा, दूध, कापूस उत्पादक अडचणीत आहेत.

एकदा ईडीची धाड शेतकऱ्याच्या घरावरही टाका, म्हणजे तो किती अडचणीत आहे, ते कळेल अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. इतर शेतकऱ्यांनीही त्यांना साथ दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments