पोलिसांनी छापा टाकून पावणे सहा लाखांचा तंबाखूजन्य माल पकडला

श्रीरामपूर शहर पोलीसांनी बेलापूर बु. येथे छापा टाकून सुगंधी तंबाखू गुटखा पानमसाला व टेम्पो असा 5 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पोलिसांनी याप्रकारणी तिघांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसारत पोलिसांनी हा छापा मारला आहे.
दरम्यान बेलापूर बु. येथील महालगल्ली येथे आरिफ युनूस शेख याच्या राहत्या घरासमोर पोलिसांनी एक टेम्पो पकडला. यामध्ये गुटखा पानमसाला व सुगंधी तंबाखू आढळून आली. टेम्पोसह एकूण मालाची किंमत 5 लाख 75 हजार इतकी असून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हरिश अशोक पानसंबळ यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी रियाज रऊफ शेख (वय 35, रा. महेशगल्ली, बेलापूर),
नगर्या उर्फ साहिल इरफान इनामदार (वय 22, रा. रामगड, बेलापूर बु.), युसूफ बशीर पिंजारी (वय 32, रा. बेलापूर), मेहबूब इमाम तांबोळी (रा. बेलापूर बु.) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.