Smallest Hill Station In India : नैसर्गिक सौंदर्याने भरलेले हे आहे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन! पावसाळ्यात एकदा अवश्य भेट द्या
देशामध्ये अनेक मोठंमोठी हिल स्टेशन असलेले तुम्ही ऐकले असेल. मात्र भारतामध्ये असे एक हिल सेटशन आहे जे भारतातील हिल स्टेशन्सपैकी सर्वात लहान हिल स्टेशन आहे.

Smallest Hill Station In India : सध्या देशभरात मान्सूनचा पाऊस सुरु आहे. या पावसाळ्यात अनेकजण फिरायला जाणायचा प्लॅन करत असतात. बहुतेकजण हिल स्टेशनच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. या ठिकाणी निसर्ग सौंदर्याने भरलेले नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी अनेकजण अशा हिल स्टेशन्सला भेट देत असतात.
भारतात पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना हिल स्टेशन्स आकर्षित करत असतात. हिल स्टेशनच्या ठिकाणी अनेक उंचच्या उंच धबधबे पाहायला मिळतात. तसेच नयनरम्य नैसर्गिक दृश्य देखील या ठिकाणी पर्यटकांना पाहायला मिळतात.
भारतात खूप उंचच्या उंच हिल स्टेशन आहेत मात्र तसेच भारतात सर्वात लहान देखील एक हिल स्टेशन आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात भेट देऊन नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.
भारतात नैसर्गिक सौंदर्याने भरलेली अनेक पर्यटन स्थळे आहेत. तसेच धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे देखील भारतात काही कमी नाहीत. दरवर्षी अशा ठिकाणी लाखो पर्यटक भेट देत असतात. उत्तराखंड आणि महाराष्ट्रात अनेक उंच हिल स्टेशन्स आहेत.
तसेच भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील या सर्वात लहान हिल स्टेशनला तुम्ही भेट देऊन सहलीचा आनंद घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन्सबद्दल…
माथेरान हे सर्वात लहान हिल स्टेशन आहे
देशातील महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान हिल हिल स्टेशन आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान हे देशातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे. हे सौंदर्याच्या बाबतीत मोठ्या हिल स्टेशनला देखील मागे टाकू शकते.
या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता कठीण असल्याने कार किंवा इतर वाहन जाऊ शकत नाही. या ठिकाणी पर्यटन जाण्यासाठी टॉय ट्रेनचा वापर करावा लागतो. ही ट्रेनही उंच डोंगरांच्या बाजूने अत्यंत अवघड मार्गावरून जाते. या ठिकाणी टॉय ट्रेनमधून जाताना तुम्ही आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
माथेरान प्रदूषणमुक्त हिल स्टेशन
माथेरान हे महाराष्ट्रातील प्रदूषण मुक्त हिल स्टेशन आहे. कारण या ठिकाणी कोणतेही वाहन जात नाही. पेट्रोल आणि डिझेलवरील कोणतेही वाहन या ठिकाणी जात नसल्याने हे हिल स्टेशन प्रदूषण मुक्त आहे.
पाहण्यासारखे सुंदर दृश्य
माथेरानमध्ये अनके नैसर्गिक दृश्य तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला तलाव, उद्याने आणि 20 पेक्षा जास्त व्ह्यूपॉइंट्स पाहायला मिळतील. अफाट नैसर्गिक सौंदर्याने भरलेले हे हिल स्टेशन तुमच्या सहलीचा नक्कीच आनंद वाढवेल. या ठिकाणी तुम्ही मंत्रमुग्ध करणारे धबधबे पाहू शकता.
त्यामुळे तुम्हीही या पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी माथेरान हे हिल स्टेशन अतिशय सुंदर ठिकाण आहे. जरी हिल स्टेशन सर्वात लहान असले तरीही या ठिकाणी अनेक नैसर्गिक दृश्य तुम्हाला पाहायला मिळतील.