Smartphone Offer : अप्रतिम ऑफर ! OnePlus आणि Samsung चे फोन 30 हजारांनी स्वस्तात आणा घरी; लगेच घ्या लाभ
तुम्ही स्वस्तात OnePlus आणि Samsung चे फोन घरी आणू शकता. या फोनवर 30 हजार रुपयांपर्यंत तुम्हाला सूट मिळेल.

Smartphone Offer : जर तुम्हाला स्वस्तात मस्त असाल फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही संधी आलेली आहे. कारण आता तुम्ही OnePlus आणि Samsung चे महागडे फोन खूप कमी किमतीत घरी आणू शकता.
सध्या Amazon वर तुम्हाला स्वस्तात हे फोन मिळत आहेत. या सेलमध्ये तुम्ही OnePlus, Oppo आणि Samsung चे स्मार्टफोन MRP वरून 30 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटसह खरेदी करू शकता. तसेच या सेलमध्ये स्मार्टफोनवर आकर्षक बँक डिस्काउंटही देण्यात येत आहेत.
याशिवाय, अॅमेझॉनच्या या डीलमध्ये तुम्ही तुमचा आवडता फोन आकर्षक नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. OnePlus, Oppo आणि Samsung च्या ज्या फोनवर ही डील ऑफर केली जात आहे, त्या फोनमध्ये तुम्हाला 80 वॅट्सपर्यंत चार्जिंगसह चांगला कॅमेरा आणि डिस्प्ले मिळेल. तुम्ही याबद्दल सविस्तर डिटेल्स जाणून घेऊ शकता.
OnePlus 10R 5G
8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची एमआरपी 38,999 रुपये आहे. सेल Amazon डीलमध्ये, तुम्ही 15% डिस्काउंटनंतर 32,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सेलमध्ये या फोनवर 3 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटही दिला जात आहे.
एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत 29,900 रुपयांनी कमी करू शकता. जर या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये तुम्हाला 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा डिस्प्ले पाहायला मिळेल. या फोनचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो, जो 80 वॉट सुपरव्हीओओसी चार्जिंगसह येतो.
Oppo A78
Oppo चा हा फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. त्याची एमआरपी 22,999 रुपये आहे, परंतु या डीलमध्ये 24% डिस्काउंटनंतर ती 17,499 रुपयांची असेल. तुम्ही हा फोन 848 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता.
एक्स्चेंज ऑफरमध्ये फोन घेतल्यास, तुम्हाला 16,350 रुपयांपर्यंतचा आणखी फायदा मिळू शकतो. आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.4 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी, तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळेल. तर या फोनची बॅटरी 5000mAh आहे, जी 67 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते.
Samsung Galaxy M33 5G
सॅमसंगचा हा 5G फोन 8 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. कंपनी यावर 35% सूट देत आहे. डिस्काउंटनंतर त्याची किंमत 25,999 रुपयांवरून 16,999 रुपये झाली आहे.
एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही फोनची किंमत 16 हजार रुपयांनी कमी करू शकता. कंपनीने फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. तर फोनच्या मागील बाजूस तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळेल. त्याची बॅटरी 6000mAh आहे. अशा प्रकारे तुमच्यासाठी हा एक उत्तम स्मार्टफोन असणार आहे.