Smartphone Tips : पावसात तुमचा स्मार्टफोन भिजला तर….? फोन खराब होण्यापासून वाचवण्यासाठी ‘या’ टिप्स अवश्य लक्षात ठेवा
पावसाळा सुरु झाला आहे. अशा वेळी घराबाहेर पडल्यानंतर पाऊस आल्यास तुमचा स्मार्टफोन भिजण्याची शक्यता अधिक असते.

Smartphone Tips : सध्या देशात अनेक भागात पावसाळा सुरुवात झाली आहे. पावसाच्या दिवसात तुम्ही दुचाकी घेऊन घराबाहेर पडला आणि अचानक पाऊस आला तर तुमचा स्मार्टफोन खराब होण्याची शक्यता अधिक असते.
अशा वेळी लोक घाबरून अनेक चुकीचे उपाय करून स्मार्टफोन दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही तुमचा स्मार्टफोन भिजल्यानंतर वापरू शकता. सविस्तर टिप्स खाली जाणून घ्या…
फोन बंद करा
मोबाईल पाण्यात भिजला असेल किंवा पडला असेल तर तो लगेच बंद करा. फोन ऑन करण्याची चूक करू नका, कारण पाण्याचा एक थेंबही फोनच्या आत गेला तर ते एकमेकांशी जोडून चिपमधील सर्किट्स खराब करू शकतात. तुमचा फोन देखील स्पार्किंग करत असेल. इअरफोन, सिम कार्ड आणि मेमरी कार्ड यांसारख्या फोनला जोडलेल्या अॅक्सेसरीज ताबडतोब काढून टाका.
पाण्यात भिजलेला फोन पटकन स्वच्छ करा
जिथे पाणी दिसत असेल तिथे फोन काळजीपूर्वक स्वच्छ करा. तुम्ही कोरड्या आणि ओल्या कापडाचा वापर करून फोन स्वच्छ करू शकता.
फोन कोरडा करा
फोनचे वेगवेगळे भाग पूर्णपणे कोरडे करा. फोन हवेत सुकवण्यासाठी चार्जर किंवा ड्रायर वापरू नका, कारण तो आधी खराब होऊ शकतो.
फोन चार्ज करू नका
फोन कोरडा असल्याची खात्री झाल्याशिवाय फोन चार्ज करण्याचा प्रयत्न करू नका. तांदूळ, बॉक्स किंवा सिलिकॉन जेल वापरा
शक्य असल्यास, तुम्ही फोन तांदळाच्या डब्यात ठेवू शकता किंवा फोनला सिलिकॉन जेल वापरू शकता. हे ओलेपणा सुकविण्यात मदत करू शकतात.
तज्ञांचा सल्ला घ्या
जर फोन पूर्णपणे खराब झाला असेल किंवा फोनची स्थिती पूर्वपदावर येत नसेल, तर तुम्ही एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या जो तुम्हाला योग्य मार्गदर्शक करेल. व जर तुम्ही या सर्व टिप्स व्यवस्थित पाळल्या तर नक्कीच तुमचा स्मार्टफोन पुन्हा नव्यासारखा चालेल.