Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरराम जन्मभूमीसाठी आतापर्यंत पाच लाख लोकांनी बलिदान - धनश्री विखे पाटील

राम जन्मभूमीसाठी आतापर्यंत पाच लाख लोकांनी बलिदान – धनश्री विखे पाटील

Ahmednagar News : राम जन्मभूमीसाठी आतापर्यंत पाच लाख लोकांनी बलिदान दिले आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशवासीयांना दोन वेळा दिवाळी साजरी करण्याचे भाग्य लाभले आहे.

येथे २२ तारखेला धार्मिक पाविर्त्य राखत घराघरात दिवाळी साजरी करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या धनश्री सुजय विखे यांनी केले.

तालुक्यातील शिरसाटवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन, साखर वाटप कार्यक्रमात्य बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संध्या आपले, ललिता शिरसाठ व अर्जुन शिरसाठ, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड जगदंब प्रतिष्ठानचे संघटक ॲड. प्रतीक खेडकर, बाजार समितीचे संचालक अजय रक्ताटे आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना विखे म्हणाल्या, नगर जिल्हा आपल्याला कुटुंब प्रमाणे वाटतो. विखे व आमदार मोनिका राजळे परिवारावर लोकांनी नेहमीच प्रेम केले. असाच आशीर्वाद कायम ठेवा.

प्रत्येक भारतीयांसाठी २२ तारखेचा दिवस मोठ्या आनंदाचा असून पारंपारिक पद्धती सारखी दिवाळी साजरी करून प्रभू रामचंद्राचे पूजन करा असे आवाहन विखे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन शिरसाठ, सूत्रसंचालन अनंत कराड तर आभार अजय रक्ताटे यांनी मानले. विखे यांनी आज माणिकदोंडी गणातील प्रमुख गावांमध्ये दौरा करत लोकांशी संपर्क साधत विविध विकास कामांचे भूमिपूजन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments