तर तुला घरातच जिवंत गाडून टाकीन… विवाहितेला धमकी

राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर परिसरात एक विनयभंगाची घटना घडली आहे. तुझा नवरा तुला नांदवीत नाही, तू माझ्याकडे रहा. मी तुला सांभाळतो.
असे म्हणून विवाहित तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील बारागांव नांदूर परिसरात एक 26 वर्षीय विवाहित तरूणी तिच्या सासरच्या नातेवाईकांसह राहत आहे.
दि. 29 एप्रिल रोजी साडे अकरा वाजे दरम्यान आरोपी लतिफ गुलाब शेख हा त्या विवाहित तरूणीला म्हणाला, तुझा नवरा तुला नांदवीत नाही. तू माझ्याकडे घरी रहा. मी तुला सांभाळतो.
असे म्हणून त्याने विवाहित तरुणीचा विनयभंग केला. विवाहितेने विरोध केला असता आरोपी शेख म्हणाला, तू कोणाला काहीएक सांगू नको.
तू जर कोणाला काही सांगितले तर तुला घरातच जिवंत गाडून टाकीन. अशी धमकी दिली. पीडितेने याबाबत आपल्या माहेरच्या लोकांना सांगितला.
त्यांनी ताबडतोब राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी लतिफ गुलाब शेख, (राहणार बारागाव नांदूर, ता. राहुरी). याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.