अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: एकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेत संपविले जीवन

शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत शामराव लक्ष्मण खांदवे (वय 53 रा. सांडवे ता. नगर) यांनी आत्महत्या केली. बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान खांदवे यांनी गळफास का घेतला याची माहिती अद्याप समोर आली नसून पोलीस तपास करत आहेत.

सांडवे शिवारातील शेती गट नंबर 117 मधील लिंबाच्या झाडाला शामराव खांदवे यांनी गळफास घेतला. बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली.

शामराव यांना दत्तात्रय कारभारी खांदवे यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. दरम्यान शामराव हे उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button