अहमदनगर

नगरमध्ये घरात घुसून युवतीसोबत केलं असे काही…

घरात घुसून युवतीचा विनयभंग केल्याची घटना रविवारी दुपारी नगर शहरात घडली. या प्रकरणी बंटी राऊत (रा. माणिक चौक, अहमदनगर)

याच्याविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवतीने फिर्याद दिली आहे.

रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी युवती राहत्या घरामध्ये एकटीच होती. फिर्यादी अपंग असल्याचा गैरफायदा घेऊन बंटी राऊत याने घरामध्ये प्रवेश केला.

फिर्यादीकडे विचारपूस करण्याच्या बहाण्याने अंगला स्पर्श करून गैरवर्तन केले. यानंतर तो तिथून निघून गेला. याबाबत फिर्यादी व त्यांच्या पतीने त्याला विचारणा केली असता

फिर्यादी व त्यांच्या पतीला हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलिस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button