Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरइंटरनेटच्या कटकटीशिवाय मोबाईलवर व्हिडीओ बघणे लवकरच शक्य

इंटरनेटच्या कटकटीशिवाय मोबाईलवर व्हिडीओ बघणे लवकरच शक्य

Ahmednagar News : इंटरनेटशिवाय मोबाईल चालणे सध्या तरी निव्वळ अशक्यच. पण जर इंटरनेटच्या कटकटीशिवाय मोबाईलवर व्हिडीओ पाहण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचे स्वप्न कदाचित लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

ही इच्छा डायरेक्ट टू मोबाईलच्या माध्यमातून साकार होणार आहे. ‘डायरेक्ट-टू- मोबाईल’ प्रसारणाच्या माध्यमातून मोबाईल वापरकर्ते सिमकार्ड किंवा इंटरनेट कनेक्शनशिवाय व्हिडीओ स्ट्रीम करू शकतील.

देशांतर्गत डायरेक्ट-टू-मोबाईल अर्थात डी २एम तंत्रज्ञानाची लवकरच १९ शहरांमध्ये चाचणी केली जाईल आणि या उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी ४७०- ५८२ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम राखून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील,

असे संकेत माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी मंगळवारी एका परिषदेत बोलताना दिले.

या तंत्रज्ञानाच्या मदतीने २५ ते ३० टक्के व्हिडीओ ट्रॅफिक ‘डी २एम’ वर स्थलांतरित केल्याने ५जी नेटवर्कवरची गर्दी कमी होईल. परिणामी देशातील डिजिटल परिवर्तनाला गती मिळेल.

या तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी गेल्या वर्षी बंगळुरू, ड्युटी पथ आणि नोएडा येथे प्रायोगिक चाचणी प्रकल्प राबवण्यात आला होता असे अपूर्व चंद्र यांनी सांगितले.

‘डी २एम’ तंत्रज्ञान देशभरातील सुमारे ८ ते ९ कोटी घरांपर्यंत टीव्ही पोहोचण्यास मदत करेल. देशातील २८ कोटी कुटुंबापैकी केवळ १९ कोटी कुटुंबांकडे दूरदर्शन संच आहेत. देशात ८० कोटी स्मार्टफोन असून वापरकर्त्यांसाठी ६९ टक्के सामग्री व्हिडीओ स्वरूपात आहे, अशी माहिती चंद्र यांनी दिली.

व्हिडीओच्या जास्त वापरामुळे मोबाईल नेटवर्क ब्लॉक होऊन ते थांबून थांबून चालते. सांख्य लॅब्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नी, कानपूर यांनी विकसित केलेले ‘डी २एम’ प्रसारण तंत्रज्ञान, व्हिडीओ, ऑडिओ आणि डेटा सिग्नल थेट सुसंगत मोबाईल आणि स्मार्ट उपकरणांवर प्रसारित करण्यासाठी स्थलनिहाय दूरसंचार पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक प्रसारक नियुक्त स्पेक्ट्रम वापरते असेही त्यांनी सांगितले.

डी २एम’ म्हणजे काय आणि त्याचे फायदे?

■ डीटीएचप्रमाणेच हे थेट मोबाईल ब्रॉडकास्टिंग तंत्रज्ञान आहे ज्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. याच्या मदतीने स्मार्टफोनवर इंटरनेटशिवाय व्हिडीओ पाहू शकता.

■ इंटरनेट सुविधा नसलेल्या भागातील वापरकर्ते ओटीटी अॅप्सवर व्हिडीओ पाहू शकतील. डी २ एम प्रसारण सुरू झाल्यावर किमान व्हिडीओ पाहण्यासाठी हाय-स्पीड इंटरनेटची गरज संपुष्टात येईल

■ ‘डी २एम’ तंत्रज्ञान आल्यानंतर या तंत्रज्ञानाला सहाय्य्यभूत असलेले नवीन फोनदेखील बाजारात येतील.

■ ‘डी २एम’ सपोर्टसाठी, सर्व मोबाईल बँडना त्यांच्या फोनमध्ये ‘डी २एम’ अँटेना द्यावा लागेल जो डीटीएचसाठी असलेल्या सेटअप बॉक्सप्रमाणे काम करेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments