बाजारभाव

जिल्ह्यात असे आहेत सोयाबीन आणि कांदा बाजारभाव..

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल गुरुवारी 6413 गोणी कांदा आवक झाली. कांद्याला सर्वाधिक 1300 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सोयाबिनला 7211 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत काल 6 हजार 413 कांदा गोणी आवक झाली. कांदा नंबर 1 ला 900 रुपये ते 1300 रुपये असा भाव मिळाला.

कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला 550 ते 850 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 500 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 ते 800 रुपये भाव मिळाला.

जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला. सोयाबिनला कमीत कमी 7160 रुपये, जास्तीत जास्त 7211 तर सरासरी 7185 रुपये असा भाव मिळाला.

हरभरा कमीत कमी 4430 रुपये, जास्तीत जास्त 4469 रुपये, तर सरासरी 4450 रुपये असा भाव मिळाला.

गव्हाला कमीत कमी 2094 रुपये, जास्तीत जास्त 2300 रुपये, तर सरासरी 2200 रुपये इतका भाव प्र्रतिक्विंटलला मिळाला.

राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 438 के्रटसची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला 71 ते 100 रुपये असा भाव मिळाला.

डाळींब नंबर 2 ला 46 ते 70 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 21 ते 45 रुपये भाव मिळाला. तर डाळिंब नंबर 4 ला 10 ते 20 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button