Soybean Best Varieties : शेतकऱ्यांनो सोयाबीनची पेरणी करताय? तर एकदा जाणून घ्या सोयाबीनचे सुधारित वाण, कमी वेळेत देतील बंपर उत्पादन
खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी करायची असेल तर बाजारात अनेक सोयाबीनचे वाण उपलब्ध आहेत. तसेच ही वाणे शेतकऱ्यांना भरघोस उत्तापदं देखील देऊ शकतात.

Soybean Best Varieties : देशात सध्या मान्सूनचा पाऊस सुरु आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाची सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामामध्ये अनेक प्रकारची पिके घेतली जातात. सोयाबीन हे खरीप हंगामधील महत्वाचे पीक आहे.
सोयाबीन हे एक असे पीक आहे जे कमी वेळेत शेतकऱ्यांना सर्वाधिक नफा कमवून देते. सध्या अनेक शेतकरी सोयाबीन पिकाची पेरणी करत आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिक उत्पादन देणाऱ्या सोयाबीनच्या जाती माहिती नाहीत.
सोयाबीनची पेरणी करताना अनेक गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे बियाणांची निवड. बियाणांची निवड ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या बियाणांवर पिकाचे उत्पादन ठरते. तुम्हीही सोयाबीनची पेरणी करणार असाल तर खालील सोयाबीनचे वाण सर्वोत्तम आहेत.
BS 6124
तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी करणार असाल तर तुमच्यासाठी BS 6124 ही सोयाबीनचे वाण सर्वोत्तम आहे. या वाणापासून तुम्हाला हेक्टरी 20-25 क्विंटल उत्पादन मिळू शकते. या वाणाचे सोयाबीनचे पीक ९० ते ९५ दिवसांत तयार होते.
JS 2069
सोयाबीन पेरणी करायचे असेल तर JS 2069 हे वाण उत्तम आहे. या वाणाची पेरणी 15 जून ते 22 जून या कालावधीमध्ये करता येते. या वाणापासून तुम्हाला हेक्टरी 22-26 क्विंटल उत्पादन मिळू शकते. ही जात तयार होण्यास ८५ ते ८६ दिवस लागतात.
MACS 1407
MACS 1407 ही एक सोयाबीनची भरघोस उत्पादन देणारी व्हरायटी आहे. सोयाबीनची ही व्हरायटी हेक्टरी 30 ते 39 क्विंटल उत्पादन देते. ऍफिड्स, पांढरी माशी आणि डिफोलिएटर या रोगांना प्रतिरोधक व्हरायटी आहे.
JS 2034
JS 2034 या सोयाबीनच्या जातीपासून देखील शेतकऱ्यांना एक हेक्टरमध्ये 24-25 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. सोयाबीनचे हे पीक 80-85 दिवसात तयार होते. तसेच या जातीच्या सोयाबीनला रोग देखील कमी आहे.