
आज सोयाबीन ला सात हजार 400 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची 336 क्विंटल इतकी आवक झाली.
त्याकरिता 6501 किमान भाव, सात हजार चारशे रुपये कमाल भाव आणि 7150 सर्वसाधारण भाव मिळाला आहे. तर आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1067 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता कमाल भाव 7280 रुपये राहिला.
सोयाबीनचा सर्वसाधारण भाव हा सात हजार 300 रुपयांपर्यंत राहिला. सध्याचे सोयाबीन बाजार भाव बघता हंगामाच्या शेवटी हे बाजार भाव सात हजार हुन अधिक रुपयांवर स्थिर राहिलेले दिसून येत आहेत.
मध्यंतरी सोयाबीनचे बाजार भाव हे सहा हजार रुपयांवर आले होते. मात्र रशिया युक्रेन युद्धाच्या सुरुवातीच्या काळापासून सोयाबीनच्या दरात अचानक वाढ झाली.
आणि तेव्हापासून आजपर्यंत सोयाबीनचे भाव 7 हजार रुपयांच्या वर स्थिर आहेत. मात्र राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला माल यापूर्वीच विकला आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या मालाची साठवणूक केली असून त्यांच्याकरिता हा सोयाबीनचा बाजारभाव फायदेशीर ठरू शकतो.