Farming News : सोयाबीन, बाजरी सुकू लागली : भात पिकाला मोठ्या पावसाची आस

त्यात साधारण २१०० दशलक्ष घनफूट पाणी साठले आहे. मात्र, तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने डोळे उघडल्याने १९७२ सारखा दुष्काळ पडतो की काय ?

तालुक्यातील भंडारदरा धरण ओसंडून वाहत असून निळवंडे व आढळा धरण भरण्याच्या मार्गावर आहे, तर बारा लघु पाटबंधारे तलावांपैकी दहा तलाव पूर्ण भरले,

त्यात साधारण २१०० दशलक्ष घनफूट पाणी साठले आहे. मात्र, तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने डोळे उघडल्याने १९७२ सारखा दुष्काळ पडतो की काय ?

अशी चिंता व्यक्त होत आहे. सोयाबीन, बाजरी पिके पावसाअभावी सुकू लागली असून भात पिकाला देखील मोठ्या पावसाची आस लागून आहे.

Advertisement

तालुक्यात घोटी शिळवंडी, सांगवी, पाडोशी, अंबित, शिरपुंजे, बलठण, कोथळे, टिटवी, बोरी, बेलापूर बदगी, वाकी, पिंपळगाव खांड असे बारा लपा तलाव आहेत.

पैकी दक्षिण पठार भागाला वरदान असलेले बेलापूर बदगी व बोरी लघु पाटबंधारे प्रकल्प, तसेच १५५ दशलक्ष घनफूट क्षमतेचा कोटमारा तलाव दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हे तीन तलाव भरले नसल्याने परिसरातील शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

जून, जुलै महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मात्र, संगमनेर अकोले तालुक्याच्या दक्षिणेस पठार भागाकडे मोठ्या पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाचे तीन महिने संपले, सप्टेंबर सुरू झाला, तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही.

Advertisement

त्यामुळे बेलापूर बदगी व कोटमारा धरणांत अतिशय कमी पाणीसाठा सध्या आहे. म्हणून शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुटवाडी येथील कोटमारा धरणावर कुरकुटवाडीसह आंबीदुमाला, बोटा आदी गावांचे भवितव्य अवलंबून असते.

बेलापूर बदगी लघु पाटबंधारे प्रकल्पावर बेलापूरसह, चैतन्यपूर, बदगी, जांभळे, ब्राह्मणवाडा या गावांचे भवितव्य अवलंबून असते. वरील दोन्ही धरणे कच नदीवर आहेत. कच नदीचे उगमस्थान असलेल्या ब्राह्मणवाडा परिसरात दमदार पाऊस झालेला नाही.

Advertisement
Exit mobile version