बाजारभाव

Soybean price today : सोयाबीनच्या दरात वाढ झाली ! दर पोहोचले इतक्या हजारांवर..

Soybean price today :- आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय चित्र राहणार याकडेच सर्व  शेतकऱ्याचे लक्ष लागले होते. पण शेतकऱ्यांना दिलासा देणारे चित्र सोमवारी बाजारपेठेत आहे. कारण 300 रुपयांनी सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. (soybean price today in maharashtra)

मात्र, कमी वेळेत दरात अधिकचा अस्थिरता यामुळे सोयाबीनची साठवणूक करावी का विक्री हा प्रश्न हंगामाच्या अंतिम टप्प्यातही कायम आहे. पण शनिवारी घटलेल्या दराचा परिणाम आवक झाला आहे. तर सोमवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Soyabean Price In Latur ) सोयाबीनला सरासरी 7 हजार 200 चा दर मिळाला आहे.

गतआठवड्यात दरात वाढ होत असल्याने 15 हजार पोत्यांची आवक ही थेट 30 हजार पोत्यांपर्यंत गेली होती. हंगामाच्या अंतिम टप्प्यात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी साठवणूक केलेले सोयाबीन (soybeans for sale) विक्रीसाठी बाहेर काढले होते.

मात्र, हीच आवक कायम राहिली नाही. शनिवारी अचानक दरात मोठी घसरण झाली असे असतानाही 30 हजार पोत्यांची आवक ही लातूर बाजार समितीमध्ये झाली होती. त्यामुळेच सोमवारी शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतलेली आहे. सोमवारी दर वाढूनही 25 हजार पोत्यांची आवक झाली होती.

ज्या शेतकऱ्यांना गरज होती त्यांनी सोयाबीनची विक्री केलेली आहे मात्र, ज्यांना वाढीव दराची अपेक्षा आहे त्यांनी अजूनही साठवणूकीवरच भर दिला आहे. मात्र, गेल्या आठ दिवासांतील चित्र पाहता साठवणूक की विक्री ? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

शिवाय दरातील चढ-उतारामुळे व्यापाऱ्यांनाही अंदाज हा बांधता येत नाही. मात्र, शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर ते फायद्याचे राहणार आहे.

सध्या अस्थिरता निर्माण झाली असून यामध्ये कुणाचे साधणार आणि कुणाचे नुकसान होणार हे सांगता येत नसल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

गेल्या आठ दिवसातील चढ-उतारानंतर आता सोयाबीनचे काय होणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. गावोगावात सोयाबीनचे दर जाणून घेण्यात शेतकरी दंग आहे.

शिवाय विक्री की साठवणूक याबबातही विविध अंगाने चर्चा केली जात आहो. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना सोयाबीन बाजारपेठेच्या केंद्रस्थानी आले आहे.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/02/2022
जळगाव क्विंटल 17 6600 6800 6800
शहादा क्विंटल 50 7151 7400 7200
औरंगाबाद क्विंटल 11 6400 6956 6678
संगमनेर क्विंटल 7 7195 7195 7195
सिल्लोड क्विंटल 8 6900 7100 7000
कारंजा क्विंटल 4200 5875 7175 6650
मोर्शी क्विंटल 103 6889 7175 6987
राहता क्विंटल 35 7151 7350 7231
धुळे हायब्रीड क्विंटल 6 6900 7425 6900
गंगापूर हायब्रीड क्विंटल 30 6400 6800 6500
सोलापूर लोकल क्विंटल 92 7000 7390 7200
नागपूर लोकल क्विंटल 568 5500 6836 6502
हिंगोली लोकल क्विंटल 500 6650 7175 6912
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 26 5900 7000 6700
मेहकर लोकल क्विंटल 1260 6100 7730 7110
ताडकळस नं. १ क्विंटल 66 6700 7150 7000
लातूर पिवळा क्विंटल 15801 6100 7330 7220
जालना पिवळा क्विंटल 3349 6000 7200 7000
अकोला पिवळा क्विंटल 2482 5500 7175 6600
यवतमाळ पिवळा क्विंटल 410 6000 7240 6620
आर्वी पिवळा क्विंटल 360 6000 7300 6850
चिखली पिवळा क्विंटल 1990 6100 7400 6750
बीड पिवळा क्विंटल 405 6000 7170 6989
वर्धा पिवळा क्विंटल 120 6775 7195 7000
जिंतूर पिवळा क्विंटल 256 6300 7225 6800
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 910 6650 7220 6950
दिग्रस पिवळा क्विंटल 290 6750 7400 7235
वणी पिवळा क्विंटल 332 5555 7220 6400
परतूर पिवळा क्विंटल 30 7000 7300 7273
गंगाखेड पिवळा क्विंटल 41 7250 7600 7300
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 6 6500 7151 7000
धरणगाव पिवळा क्विंटल 9 7200 7200 7200
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 550 6985 7450 7300
किल्ले धारुर पिवळा क्विंटल 426 4901 7250 7025
केज पिवळा क्विंटल 118 5600 8000 7300
मंठा पिवळा क्विंटल 33 6775 7000 6900
उमरी पिवळा क्विंटल 70 7000 7100 7050
मुरुम पिवळा क्विंटल 109 6700 7100 6900
पुर्णा पिवळा क्विंटल 44 6900 7281 7017
पालम पिवळा क्विंटल 12 6650 6650 6650
भंडारा पिवळा क्विंटल 1 6600 6600 6600
राजूरा पिवळा क्विंटल 112 6900 7400 7200
आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 173 5000 7050 6500
कळंब (यवतमाळ) पिवळा क्विंटल 30 6900 7150 7000
सोनपेठ पिवळा क्विंटल 265 6701 7400 7100
बोरी पिवळा क्विंटल 65 6800 7250 7100

Related Articles

Leave a Reply

Back to top button