बाजारभावलेटेस्ट

Soybean Rate : सोयाबीनच्या दरात वाढ कायम ! ह्या ठिकाणी मिळाला हंगामातील सर्वाधिक दर…

Soybean Rate :- यंदाच्या हंगामात सोयाबीनची आवक कायम कमी राहिलेली होती. दिवाळी नंतर दरवाढ झाल्याने आवकमध्ये सुधारणा झाली होती.

मात्र, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हंगामात 40 ते 50 हजार पोत्यांची आवक ही ठरलेलीच असते पण यंदाही एकदाही एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक झाली नाही.

सध्याच्या वाढत्या दरामुळे गुरुवारी तब्बल 30 हजार पोत्यांची विक्रमी आवक झाली आहे.आठ दिवसांपासून सोयाबीनच्या वाढत्या दराचीच चर्चा सुरु आहे.

आज (गुरुवारी) देखील (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात वाढ कायम राहिलेली आहे. एकवेळ सोन्या-चांदीच्या दराचा शेतकऱ्यांना विसर पडेल पण सोयाबीनच्या नाही.

याला कारणही तसेच आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 1 हजार रुपयांनी सोयाबीनचे दर वाढलेले आहेत. शिवाय अजून वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वाढत्या दरामुळे बाजारपेठेतील सर्व समीकरणे बदलली असून यंदाच्या हंगामातील सर्वाधिक दर गुरुवारी (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला आहे.

बुधवारी 7 हजार तर अवघ्या 24 तासांमध्ये 7 हजार 300 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे दर झाले आहे. (Soybean Arrival) शिवाय 18 ते 20 हजार पोत्यांची आवक ही थेट 30 हजार पोत्यांवर गेली आहे. असे असूनही भविष्यात दर वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अपेक्षित दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक असाच निर्णय सोयाबीन आणि कापसाबाबत शेतकऱ्यांनी घेतला होता. हंगामाच्या अंतिम टप्प्यात हा निर्णय यशस्वी ठरत आहेत. कारण गेल्या 10 वर्षात जो दर कापसाला मिळालेला नाही तो यंदा मिळालेला आहे.

कापूस सध्या 10 हजार 300 रुपयांवर स्थिरावलेला आहे तर दुसरीकडे सोयाबीनची घोडदौड ही सुरुच आहे. दहा दिवसांपूर्वी 6 हजार 200 असलेले सोयाबीन आता 7 हजार 300 वर पोहचलेले आहे.

राज्यातील आजचे विविध बाजारसमितीतील सोयाबीनचे बाजारभाव –

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
24/02/2022
नागपूर लोकल क्विंटल 825 5500 7001 6626
लातूर पिवळा क्विंटल 11972 6900 7460 7330
निलंगा पिवळा क्विंटल 180 6800 7430 7200
चाकूर पिवळा क्विंटल 130 7350 7500 7413
उमरखेड पिवळा क्विंटल 210 5800 6000 5900
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 230 5800 6000 5900
आर्णी पिवळा क्विंटल 715 6400 7540 6800

Related Articles

Leave a Reply

Back to top button