अहमदनगर

कामावरून घरी परतणाऱ्या युवकावर काळाचा घाला; या ठिकाणाची घटना

नगर -कल्याण रोडवरील बायपास येथे झाल्याची घटना घडली आहे. वैभव नामदेव शेलार (वय 26) असे मयत युवकाचे नाव आहे.

याप्रकरणी मयत युवकाचे वडील नामदेव जगन्नाथ शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मयत वैभव हा एमआयडीसीमध्ये एका कंपनीत कामाला होता.

1 मे रोजी सायंकाळी घरी परतत असताना ट्रकने पाठीमागून वैभवच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात वैभवचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर ट्रकचा चालक पसार झाला आहे. कोतवाली पोलिसांनी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button