अहमदनगर-दोंड-पुणे या शहरांतर्गत ट्रेन सुरु करा
अहमदनगर ते पुणे खाजगी, एस.टी.महामंडळची शिवशाही प्रमाणेच, दररोज जवळपास 300 शासकीय व निमसरकारी बसेस ये-जा करतात. एवढ्या बसेस दररोज धावत असताना त्यांना कोंडीची समस्या रोजच पाहायला मिळत आहे.
अहमदनगर ते दौंड -पुणे शहरांतर्गत ट्रेन सुरु करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सेंट्रल रेल्वे झोनचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी मध्य रेल्वे झोनचे जनरल मॅनेजर नरेश ललवाणी यांना देण्यात आले. यासाठी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
अहमदनगर मधून पुण्यामध्ये विविध कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांना दोंड मार्गे ये-जा करावी लागते. मात्र गर्दी आणि पर्याप्त वाहतुकीची साधने नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
क्षेत्रफळानुसार अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा मानला जातो. पुणे-दौंड-अहमदनगर या शहरांतर्गत ट्रेन सुरू झाल्यास अनेकांना मोठा प्रश्न सुटेल. त्याचबरोबर वेळेच्या बचती सोबतच सर्वसामान्यांनाही कमी पैशात प्रवास करता येऊ शकतो.
अहमदनगर ते पुणे खाजगी, एस.टी.महामंडळची शिवशाही प्रमाणेच, दररोज जवळपास 300 शासकीय व निमसरकारी बसेस ये-जा करतात. एवढ्या बसेस दररोज धावत असताना त्यांना कोंडीची समस्या रोजच पाहायला मिळत आहे.
त्याचबरोबर आर्थिक झळ बसते. त्यामुळे अहमदनगर – पुणे ट्रेन धावू लागली तर लोकांचा प्रवास सुकर होईल, भाडे वाचेल, रेल्वेचे उत्पन्नही वाढेल. व ही ट्रेन 100 टक्के नाही तर 120 टक्के धावेल, असेही निवेदनात म्हटले आहे.