अहमदनगर

कंपनीत चोरी करून पळाले; पोलिसांनी मुद्देमालासह पकडले

अहमदनगर- नागापूर एमआयडीसीतील कंपनीचे शेड उचकटुन स्टीलच्या बॉल बेअरिंग चोरी करणार्‍या समीर कादीर ताबोंळी (वय 36 रा. लक्ष्मीनगर, पर्वती, जि. पुणे) व संकेत पोपट आढाव (वय 22 रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

 

त्यांच्याकडून 20 हजार रूपये किंमतीची बॉल बेअरिंग व पाच लाख रूपये किंमतीची कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

वासुदेव अर्जुन खेडकर (वय 49 रा. भिंगार) हे सीजी पॉवर अ‍ॅण्ड सोलुशन मोटर डिव्हीजण, एमआयडीसी येथे सिक्युरीटी सुपरवायझर म्हणून नोकरीस आहेत. ते कंपनीतीमध्ये ड्युटीवर असलेला अज्ञात इसम बीएसआर शॉप मधुन बाहेर पडून पळून जाताना त्यांना दिसला होता. बीएसआर शॉपची पहाणी केली असता कंपनीतील शॉपचे छत उचकटुन आत प्रवेश करून स्टीलच्या बॉल बेअरींग चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, लक्ष्मण खोकले, संदीप दरदंले, दीपक शिंदे, शंकर चौधरी, सागर ससाणे, मयुर गायकवाड, योगेश सातपुते, बबन बेरड यांच्या पथकाने नागापुर, एमआयडीसी व बोल्हेगाव परिसरात फिरून चोरट्यांच्या वास्तव्याबाबत माहिती घेतली. समीर ताबोंळी, संकेत आढाव कारमधून बॉल वेअरींग विक्री करण्यासाठी बोल्हेगाव फाटा येथे येताच पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूूली दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button