अहमदनगर
बांधकामासाठी आणलेले लोखंडी गज चोरले; तिघांविरूध्द गुन्हा

गोडाऊनचे बांधकाम सुरू असलेल्या साईटवरून तिघांनी 25 हजार 600 रूपये किंमतीचे लोखंडी गज चोरून नेले.
नागापूर एमआयडीसीतील प्लॅट क्रमांक एक्स 28 गुगळे बटल कंपनीचे मागे गुरूवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. या प्रकरणी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील गिरधदास पारेख (वय 57 रा. घुमरे गल्ली, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीमध्ये रमेश देवराम जगधने (रा. मानोरी ता. राहुरी) व त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांचा समावेश आहे.
फिर्यादी पारेख यांचा बिल्डींग मटेरीयल व्यावसाय आहे. त्यांचे एमआयडीसीत गोडाऊनचे काम सुरू आहे. याठिकाणी बांधकामासाठी आणलेले गज तिघांनी चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खैरे करीत आहेत.