सावधान ! साई संस्थानची बदनामी केल्यास कठोर कारवाई करणार

Ahmednagar News : श्री साईबाबा आणि श्री साईबाबा संस्थानच्या विरोधात बदनामीकारक तसेच भाविकांना भडकावणाऱ्या, भावना दुखावणाऱ्या पोस्ट, मॅसेज अथवा संस्थानविषयी खोटी माहिती समाज माध्यमांवर प्रकाशित करून साई संस्थानची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सीवा शंकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, काही व्यक्ती समाज माध्यमांवर श्री साईबाबा संस्थानने एका विशिष्ट धर्माच्या कामासाठी मोठ्या स्वरूपात निधी, देणगी दिली असून, एका विशिष्ट धर्माच्या कामासाठी निधी, देणगी नाकारलेली आहे, अशा आशयाची पोस्ट समाज माध्यमांवर सातत्याने व्हायरल करत आहेत.
श्री साईबाबा संस्थानच्या नावलोकीकास बाधा आणणाऱ्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टमुळे श्रो साईभक््तांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होत असून, त्यांच्या भावना दुखविल्या जात आहेत. ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असून कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणारी आहे.
श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून सर्वधर्मिय भाविक लाखोंच्या संख्येने शिर्डी येथे येत असतात. आलेल्या भाविकांचे श्रींचे दर्शन, निवास आणि प्रसाद भोजन व्यवस्था सुलभ तथा सुरक्षित होण्यासाठी संस्थानमार्फत विविध सेवा सुविधांची उभारणी करण्यात आलेली आहे.
अनेक भाविक मोठ्या श्रध्देने श्रो साईबाबांना विविध स्वरूपात देणगी देत असतात. श्री साईबाबा संस्थानला मिळालेल्या देणगीचा विनियोग, महाराष्ट्र शासनाने पारीत केलेल्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था अधिनियम, २००४ मधील तरतुदीनुसारच संस्थानमार्फत करण्यात येतो. तथापि, संस्थानने विशिष्ट धर्माच्या कामासाठी निधी, देणगी दिली. व एका विशिष्ट धर्माच्या कामासाठी निधी, देणगी नाकारली, अशा आशयाची पोस्ट-मॅसेज सातत्याने समाजमाध्यमांवर फिरत आहेत. परंतु यामध्ये कुठलेही तथ्य नाही. अशा समाज माध्यमांवर फिरणाऱ्या खोटया पोस्ट लाईक,
फॉरवर्ड, शेअर आणि कमेंट करु नये, असे करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे यापुढे अशाप्रकारच्या खोट्या. पोस्ट, मॅसेज अथवा चुकीची माहिती समाज माध्यमांवर पसरविल्यास श्री साईबाबा संस्थानचे वतीने कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,
असे श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.सीवा शंकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.