Subsidy for Tractor trolleys : शेतकऱ्यांसाठी गोड बातमी ! ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी सरकार देत आहे अनुदान; लगेच करा अर्ज
शेतीकामासाठी ट्रॅक्टर ट्रॉली खूप महत्वाची असते. यासाठी सरकार तुम्हाला अनुदान देत आहे. त्यामुळे तुम्ही स्वस्तात ट्रॅक्टर ट्रॉली घरी घेऊन येऊ शकता.

Subsidy for Tractor trolleys : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील लाखो शेतकरी शेती करत आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांसाठी शेतकामासाठी ट्रॅक्टर खूप गरजेचं असतो.
शेतीची योग्य प्रकारे मशागत झाली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात खूप फरक पडतो. अशा वेळी जर तुम्ही नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सरकारच्या अनुदानात ट्रॅक्टर खरेदी करू शकता.
कारण अवकाळी पाऊस, पूर परिस्थिती यांसारख्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना सतत करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता राज्य आणि केंद्र सरकार सतत नवनवीन योजना आणत असते.
ज्याचा फायदा आज लाखो शेतकरी घेताना दिसत आहेत. आताही शेतकरी या सरकारच्या योजनेतून अनुदान घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खरेदी करू शकणार आहेत.
सरकार कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत आता यावर्षीपासून राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॉलीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत आता शेतकरी, महिला शेतकरी अर्ज करू शकतात. त्याशिवाय शेतकरी समूह गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्था यांनाही अर्ज करता येणार आहे.
जर तुम्हाला राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला ट्रॉली अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
सध्या शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकरी शेतातील कामांसाठी विविध यंत्रांचा वापर करत आहे. त्यामुळे जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही तुम्हाला लवकरात लवकर महाडीबीटीच्या पोर्टल वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
माहितीनुसार, शेतकऱ्यांना ट्रॉलीसाठी 45 ते 50 टक्के एवढे अनुदान मिळणार आहे. यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांना 45 टक्के तर अनुसूचित जाती, जमाती व इतर, अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान मिळणार आहे.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सरकारी योजनांची अचूक माहिती मिळवायची असेल तर लगेचच प्लेस्टोअरवर जा आणि Hello Krushi हे अँप डाउनलोड करा.
यामध्ये तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळेल त्याचबरोबर रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल. अशा प्रकारे तुम्ही सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या शेती उत्पनात खूप वाढ करू शकता.