अहमदनगर

हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

 तरूणीवर अत्याचार करत तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी करणार्‍या तरूणाविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरूणीने यासंदर्भात फिर्याद दिली असून त्यानुसार प्रदीप आण्णासाहेब पंडीत (रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, 23 जानेवारी, 2022 रोजी दुपारी 12 ते तीन वाजेच्या दरम्यान अहमदनगर- कल्याण महामार्गावरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी तरूणी व प्रदीप पंडीत हे दोघे नागापूर एमआयडीसीत कंपनीमध्ये कामाला होते. त्यांच्यामध्ये ओळख होती.

23 जानेवारी, 2022 रोजी प्रदीपने फिर्यादी तरूणीला नगरमध्ये बोलवून तिला गाडीवर बसून अहमदनगर-कल्याण महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे प्रदीपने फिर्यादी तरूणीवर बळजबरीने अतिप्रसंग केला.

त्यानंतर आरोपीने फिर्यादी तरूणीला फोन करून,‘खात्यावर पैसे टाक, नाहीतर मी तुझी बदनामी करेल’, असे म्हणून पैशाची मागणी केली.

फिर्यादी तरूणीने प्रदीपला अनेकदा पैसे पाठविले यानंतर पैसे पाठविणे बंद केल्याने प्रदीपने फिर्यादी तरूणीचे फोटो व्हॉट्सअपद्वारे स्टेटसला व्हायरल करतो, अशी धमकी देवुन खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button