Tata Car Prices : टाटांच्या कार खरेदीदारांना मोठा धक्का ! ‘या’ गाड्यांच्या किंमतीत झाली मोठी वाढ; जाणून घ्या कारच्या नवीन किंमती…
ही ऑफर दिल्यानंतर टाटाने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. आता टाटा सफारी आणि हॅरियर घरी आणण्यासाठी खूप जास्त खर्च येईल.

Tata Car Prices : भारतीय बाजारात टाटा मोटर्स हे खूप मोठे नाव आहे. बाजारात टाटांच्या कार या खूप मजबूत आणि शक्तिशाली म्ह्णून ओळखल्या जातात. यामुळे लोक सुरक्षेच्या हेतूने जास्त प्रमाणत टाटाच्या कार खरेदी करतात.
मात्र जर तुम्हीही ताटाच्या कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण जे लोक टाटाची सफारी आणि हॅरियर एसयूव्ही घेण्याचे स्वप्न पाहत होते, त्यांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.
कारण कंपनीने आपल्या सर्वोत्तम SUVs Tata Safari आणि Harrier च्या किमती वाढवल्या आहेत. टाटाने 17 जुलैपासून नवीन किमती लागू केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टाटाने या दोघांच्या किमती 20,000 रुपयांनी वाढवल्या आहेत.
गेल्या आठवड्यात टाटा मोटर्सने त्यांच्या प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमध्ये 0.6 टक्के दरवाढीची घोषणा केली होती. आता, ऑटोमेकरने मॉडेलनुसार अद्ययावत किमती जाहीर केल्या आहेत. एकदा जाणून घेऊ या.
टाटा हॅरियर आणि सफारी किमती जाणून घ्या
सफारी आणि हॅरियर श्रेणीच्या किमतीत समान वाढ झाली आहे. कंपनीने सर्व मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटच्या किंमतींमध्ये सुमारे 20,000 रुपयांची वाढ केली आहे. या नवीन किमती 17 जुलै 2023 पासून लागू झाल्या आहेत. तथापि, 17 जुलैपूर्वी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना या दोन्ही एसयूव्ही जुन्या किमतीत मिळतील.
जुलैमध्ये दोन्ही एसयूव्हीवर ऑफर उपलब्ध आहेत
एकीकडे जिथे कंपनीने धक्का दिला आहे, तर दुसरीकडे टाटा मोटर्स जुलै महिन्यात या दोन मस्त एसयूव्हीवर ऑफर देत आहे. Tata Safari बद्दल बोलायचे झाले तर, कंपनी 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.
दुसरीकडे, जर आपण हॅरियरबद्दल बोललो, तर कंपनी या शक्तिशाली एसयूव्हीवर 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.
हॅरियर आणि सफारीमध्ये नवीन वैशिष्ट्ये उपलब्ध असतील
या वर्षाच्या सुरुवातीला, हॅरियर आणि सफारीला नवीन रेड डार्क आवृत्तीमध्ये सादर करण्यात आले होते. याशिवाय, या दोन्ही SUV मध्ये आता 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री कॅमेरे आणि ADAS तंत्रज्ञान मिळेल.
हॅरियर आणि सफारी इंजिन स्पेसिफिकेशन
त्यांच्या इंजिन पॉवरट्रेनबद्दल बोलताना, सफारी आणि हॅरियर 2.0-लिटर डिझेल इंजिनसह येतात, जे 168bhp पॉवर आणि 350Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच हे सहा-स्पीड मॅन्युअल आणि सहा-स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. इंजिन BS6 फेज-2 आणि RDE नियमांनुसार अपडेट केले गेले आहे.